मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्यानं खळबळ उढाली आहे. वालदेवी नदी पुलावर दोघांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. दोघांच्या आत्महत्येची ही घटना सकाळी समोर आलीय. काल सायंकाळी ही घटना घडली असून दोघेही मालधक्का रोड इथंच राहणारे आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली.
रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. दोघांचंही वय १७ ते १८ वर्षे असून ते बारावीत शिकत होते. संकेत राठोड आणि सचिन करवर अशी त्यांची नावे आहेत. लहानपणापासूनच्या दोन मित्रांचा असा शेवट धक्कादायक आहे.संकेत आणि सचिन हे बारावीत शिकत होते. त्यांच्या आत्महत्येने कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसलाय. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत.
