Bank scam : मोठी बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रातील आणखी एका बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे, या प्रकरणातील आरोपीला जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Bank scam : ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या पतसंस्थेत ठेविदारांचे तब्बल 3 हजार 715 कोटी 58 लाख 72 हजार रुपये आडकले आहेत. सहा दिवसांपूर्वी ही आकडेवारी समोर आली होती. दरम्यान आता या प्रकरणात जालना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ज्ञानराधा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपीसह साथीदारास जालना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संजय कुटे आणि सचिव आशिष पाटोदकर यांना बीड कारागृहातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
Pune Weather News : पुण्याला 32 वर्षात पहिल्यांदा पावसाने एवढं धु- धु धुतलं, हवामान तज्ज्ञांची माहिती
ज्ञानराधा घोटाळ्यातील आरोपींना जालना आर्थिक गुन्हे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जालना जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्ञानराधा बँकेच्या विरोधात आर्थिक फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल आहेत. या आधीच बीड पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि व्यवस्थापक आशिष पाटोदकर यांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली होती. मात्र जालन्यातही अनेक तक्रारी असल्यानं जालना पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कुटे आणि पाटोदकर यांना बीड कारागृहातून ताब्यात घेतलं आहे. दोघांनाही जालना येथील सामान्य शासकीय रूग्णालयात आरोग्य तपासणी करून, सदर बाजार पोलीस ठाण्यात हलवण्यात आलं आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा पतसंस्थेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात ठेविचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात मिळून या पतसंस्थेच्या एकूण 52 शाखा आहेत. यात पावणेचार लाख ठेवीदार आणि बचत खातेदार यांचे तब्बल 3 हजार 715 कोटी 58 लाख 72 हजार रुपये अडकलेले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सुरेश कुटेंच्या राज्यभरातील 200 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेल्या 120 मालमत्तांची माहितीही पोलिसांना मिळाली आहे.