Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. आज सकाळी अमिताभ बच्चन यांनी माहिती दिली.
Amitabh Bachchan Latest News : बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना आज सकाळी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
81 वर्षीय अमिताभ बच्चन यांना आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रुग्णालया दाखल करण्यात आले. मात्र, अमिताभ यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण झाले होते. मात्र, त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.