75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Gold

Gold-Silver Rate Today : मागील आठवड्यापासून सोन्याच्या(Gold Price) किंमतीने नवनवीन विक्रम नोंदवले ज्यामुळे ग्राहकांच्या तोंडाचे पाणी पळाले. पंरतु आता मौल्यवान धातूच्या भावात पुन्हा एकदा घसरणीचे सत्र सुरू झाल्याचे दिसत असले तरीही ग्राहकांना खरेदीवर जास्त खिसा रिकामा करावा लागणार आहे.

Gold-Silver Rate Today : मार्च महिन्यात देशांतर्गत सराफा बाजारात चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. सततच्या वाढीनंतर आता सोन्याच्या(Gold Price) दरात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याभरात तेजीचे तुफान या आठवड्यात शांत झाल्याचे दिसत आहे. सोने आणि चांदीचे प्रतितोळा भाव कमी झाल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला असून पुन्हा एकदा खरेदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांच्या तुफान तेजीनंतर आज, १४ मार्च रोजी सकाळी सोन्याच्या वायदे दरात मंदी दिसून आली तर, चांदीचे वायदे तेजीत उघडले. सोन्याचा वायदा ६५,८०० हजार रुपये आणि चांदीचा ७५,३०० रुपयांच्या आसपास पोहोचला असून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीत घसरण झाली, तर चांदीच्या फ्युचर्सच्या दरात वाढ नोंदवली गेली.

सोन्या-चांदीत आज संमिश्र व्यवहार
वायदे बाजारात सुरुवातीच्या सत्रात सोन्याच्या(Gold Price) भावात घट नोंदवली गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा एप्रिल वायदा आज ९७ रुपये घसरून ६५,८०० रुपयांवर खूळ झाला तर व्यापार दरम्यान ६५,८१८ रुपये दिवसाचा उच्चांक आणि ६५,७९० रुपयांच्या दिवसाचा नीचांक नोंदवला. दरम्यान, चालू महिन्यात सोन्याचा(Gold Price) वायदा ६६,३५६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकावर पोहोचला होता. कर आणि उत्पादन शुल्क तसेच अन्य जागतिक-देशांतर्गत घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किंमती दररोज कमी-जास्त होत असतात. अशा परिस्थितीत, सराफा बाजार खरेदीला जाण्यापूर्वी ग्राहकांना सोने-चांदीच्या दरांची अचूक माहिती असली पाहिजे.

दुसरीकडे, आज चांदीच्या फ्युचर्स किंमतीत वाढ नोंदवली गेली आहे. तेजीसह सुरुवात करत एमसीएक्सवर चांदीचा मे वायदा आज १७९ रुपयांनी वाढून ७५,३४९ रुपयांवर उघडला तर सध्या ५१ रुपये वाढीसह ७५,२२१ रुपयांवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात चांदीचा भाव ७८,५४९ रुपये प्रति किलोवर उसळला होता. त्याचवेळी जागतिक बाजारात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमती घसरणीसह तर चांदीच्या फ्युचर्सच्या किमती वाढीसह सुरुवात झाली. कॉमेक्सवर सोने प्रति औंस २,१७९.५८ डॉलरवर उघडले तर, चांदीचे फ्युचर्स २५.२२ डॉलरवर उघडले.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...