75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Kalyan-Murbad Accident News : कल्याण-मुरबाड मारगावर एका अर्टिगाला भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ही अर्टिगा थेट झाडावर जाऊन धडकली. या भीषण अपघातात तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Accident News : कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या गाडीला कल्याण मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात झाला. कल्याण मुरबाड रस्त्यावरील वडापा गावाजवळ कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही अर्टिगा कार थेट झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबर होती की त्यात अर्टिगाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. माळशेज घाटात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, तिघे जखमी

कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या या अपघातात तिघांची जीव गमावला आहे. तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दोघे किरकोळ जखमी आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत सविस्तर वृत्त अद्याप आलेलं नाही.

Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...