मनोज जरांगेंना आव्हान देताना नारायण राणे यांनी मी मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू असं म्हटलं होतं. यावर जरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट खासदार नारायण राणेंना सुनावलंय. महाराष्ट्रात कुठेच फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणे यांना दिला आहे. मनोज जरांगेंना आव्हान देताना नारायण राणे यांनी मी मराठवाड्यात जाणार, जरांगे काय करतो बघू असं म्हटलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना जरांगे पाटील यांनी थेट इशाराच दिला आहे. राणेंवर टीका करताना जरांगे पाटील यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.
नारायण राणेंबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी राणेंना बोलायला लागलो तर मागे सरकरणार नाही. विनाकारण मला डिवचू नका. माझ्या नादाला लागू नका. मी धमकी दिली तर महाराष्ट्रात कुठंच फिरु देणार नाही. राणे मला काय धमक्या द्यायला लागले का? असा सवालही जरांगे पाटील यांनी विचारला.
राणेंना दिलेल्या इशाऱ्यावरही जरांगेंनी पुढे म्हटलं की, मी त्यांना म्हणालो नाही येऊ नका म्हणून. त्यांना दादा म्हणतात, तुम्ही काय माझं बघणार? तुम्ही मराठवड्यात या मी तुम्हाला दाखवतो असं तुम्हाला म्हणालो का? मी बघायला लागलो तर तुमची कोकणात फजिती होईल. मी त्यांना वारंवार म्हणतो निलेश राणे यांनी त्यांना समजावून सांगावे. मला धमक्या देऊ नका. ओबीसींवर आमच्यामुळे अन्याय होणार नाही. आधीच्या मराठ्यांमुळे देखील नाही. यांना संताजी धनाजीसारखा मी दिसायला लागलो आहे.
प्रकाश आंबेडकर गोरगरिबांचे लिडर आहेत त्यांनी समजून घ्यावं. आम्ही त्यांना विरोध केला नाही अशी सावध प्रतिक्रिया जरांगे यांनी आंबेडकरांवर बोलताना दिली. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी नवीन पिल्लू आणलं का माझ्या विरोधात बोलायला? असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी राम कदम यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावरून फडणवीसांवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस मराठे अंगावर घातले तर एकही सीट येवू देणार नाही. राम कदम हा नवीन पिल्लू आणला वाटतंय. ते बावचाळून गेलेत त्यांना काय करावं तेच कळत नाही असंही जरांगे पाटील म्हणाले.