जालना शहरात उकडलेल्या अंड्यामध्ये चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ निघाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय.
प्रथिनांनी भरपूर असलेली अंडी खाण्याचा सल्ला नेहमीच आहारतज्ज्ञ आणि डॉक्टर यांच्याकडून दिला जातो. मात्र हीच अंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. जालना शहरात अंड्यामध्ये उकडल्यानंतर चक्क प्लास्टिक सदृश्य पदार्थ निघाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंड्याच्या बाबतीत घडलेल्या या प्रकाराने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
जालना शहरातील बदर चाऊस यांनी मुलाला देण्यासाठी दुकानातून अंडी खरेदी केली. ही अंडी उकडल्यानंतर थंड झाली तेव्हा मुलाला चावता येईना. तेव्हा बदर चाऊस यांनी हा काय प्रकार आहे याची खातर जमा केली. तेव्हा त्यांना अंड्यामध्ये प्लास्टिक सदृश्य पदार्थ असल्याचं जाणवलं. ही गोष्ट त्यांनी आपल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर त्यांनी देखील या प्रकाराची खातरजमा केली. अंड्यामध्ये असणारा हा पदार्थ प्लास्टिक सारखाच असल्याने आणि खाणे योग्य नसल्याने त्यांनी ही अंडी फेकून दिली आहेत. मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
प्रीपेड इलेक्ट्रिक मीटर विरोधात जाहिर सभांचा धडाका! ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घरी…
नेकमं घडलं काय?
“आम्ही किराणा दुकानावरून अंडी आणली होती. या अंड्यांना उकडल्यानंतर मुलगा अंडी खाऊ लागला. अंडी थंड झाल्यानंतर त्यामध्ये प्लास्टिक सारखे काहीतरी असल्याचं आम्हाला जाणवलं. कोणी अंडी खावे किंवा खाऊ नये याबाबत आम्हाला काहीही म्हणायचं नाही. ही अंडी खाल्ल्यानंतर पोटात गेलेल्या प्लास्टिकमुळे कॅन्सर देखील होऊ शकतो. आणखी दुसऱ्या समस्या देखील उद्भवू शकतात. हे होऊ नये म्हणून अधिकारी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे,” अशी मागणी बदर चाऊस यांनी केली.
प्रशासनाने दखल घ्यावी
नागरिकांचे आरोग्य हा आपल्या देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्यांपैकी महत्त्वाचा मुद्दा आहे. शासन स्तरावरून नागरिकांचे आरोग्य सुधारावे यासाठी वेगवेगळ्या योजना आणि सवलती देखील दिल्या जातात. मात्र प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. या अंड्यांमध्ये निघणार्या या पदार्थाची तपासणी करून हा पदार्थ नक्की काय आहे? याचा शोध अन्न व औषध प्रशासन विभागाने घ्यावा, अशी मागणी होत आहे.