पुण्याच्या कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला होता. भरधाव Porsche Carनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती.
पुण्याच्या कल्याणीनगर भागात भीषण अपघात झाला होता. भरधाव पोर्शे कारनं दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडलं. या घटनेत त्या दोघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. अपघातानंतर त्याला लगेचच जामीन मिळाल्यानं वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर त्याचा जामीन रद्द करत त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. याच प्रकरणात त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेद्र अग्रवाल हे कोठडीत आहेत. तर त्याची आई शिवानी अग्रवाल यांना देखील शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
गोळीबाराच्या घटनेनंतर आता माजी नगरसेवक पित्रा, पुत्रावर तलवारीनं हल्ला…
दरम्यान कल्याणीनगर अपघात प्रकरणात अग्रवाल दाम्पत्याला आज सुट्टीच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. या दोघांवर ससूनमध्ये मुलाचे ब्लड सँपल बदलल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे बदललं गेलेलं रक्त सँपल हे या अल्पवयीन आरोपीच्या आईचेच असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. म्हणून आता शिवानी अग्रवाल यांच्या ब्लडची डीएनए चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी शनिवारीच औंधच्या प्रयोग शाळेत त्यांचे ब्लड सँपलही घेण्यात आले आहे. विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवाल या दोघांची पुढील तपासासाठी पोलीस कोठडी मगितली जाण्याची शक्यता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुण्याच्या कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलानं भरधाव पोर्शे कार चालवत दुचाकीवर असलेल्या तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. या अपघातामध्ये या अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात आता अग्रवाल कुटुंबाच्या अडचणी वाढल्या असून, पोलिसांनी यापूर्वीच या अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांना अटक केली आहे, तर शनिवारी अल्पवयीन मुलाच्या आईला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.