26806+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदान केलं. जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र उपचार सुरू असतानाही त्यांनी आपल्या मतदानाचं कर्तव्य पार पाडलं.

 मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदान केलं. जरांगे पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र उपचार सुरू असतानाही त्यांनी आपल्या मतदानाचं कर्तव्य पार पाडलं. समाजानं शंभर टक्के मतदान करणं गरजेचं आहे. एक नागरिक म्हणून मी कर्तव्य बजावलं, मात्र मतदान करताना आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा, सगे सोयरेच्या अमंलबजावनीच्या बाजूनं समाजानं मतदान करावं. या वेळेस पाडणारे बना, 6 जूनपर्यंत आरक्षण दिलं नाही तर देणारे बना, असं आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

‘या वेळेला पाडणारे बना आणि अशा ताकदीनं पाडा की त्याच्या पाच पीढ्या उभ्या नाही राहिल्या पाहिजे,’ असं आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केलं आहे. जरांगे पाटील यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातील गोरी गंधारी या गावात जाऊन मतदान केलं त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,  मतदान करताना समाज आणि आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीच्या बाजूनं मतदान करावं . यावेळेस पाडणारे बना, मात्र 6 जूनपर्यंत सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर मग देणारे बनू, असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांना सहकार्य केलं पाहिजे असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...