लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं असून, प्रचाराला वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीनं नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ रवी राणा यांनी अमरावतीमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत बोलताना त्यांनी प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. मंत्री असताना बच्चू कडू व यशोमती ठाकूर यांनी कोणतेही प्रकल्प आणले नाहीत, कोणतेही काम केली नाहीत. दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मी तुरुंगात गेलो, मला चादर मिळू नये म्हणून दोघांनी फोन केला, असा हल्लाबोल यावेळी रवी राणा यांनी केला आहे.
महाराष्ट्रात उन्हाचा कडाका वाढला, ‘हे’ जिल्हे रेड झोनमध्ये; हवामान विभागाकडून Heat wave चा इशारा..
नेमकं काय म्हणाले रवी राणा?
मंत्री असताना बच्चू कडू व यशोमती ठाकूर यांनी कोणतेही प्रकल्प आणले नाहीत, कोणतेही काम केली नाहीत. दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी मी तुरुंगात गेलो, मला चादर मिळू नये म्हणून दोघांनी फोन केला असा आरोप राणा यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मेळघाटातील आदिवासी कुटुंबांना मदत करण्याचं काम नवनीत राणा यांनी केलं. नवनीत राणा यांनी 5 वर्षांत उत्तम जनसंपर्क ठेवला, जिल्ह्याचे प्रश्न लोकसभेत मांडले. नवनीत राणा २२०० गावात जाऊन आल्या, आधीचे खासदार २०० गावात जात नव्हते असा टोला राणा यांनी लगावला आहे. नवनीत राणा या तीन लाख मतांनी विजयी होतील असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
‘दरम्यान आमचा भाऊ काँग्रेसची बी टीम झालेला आहे, विदर्भ सोडून मराठवाडा फिरतो, तोडीबाज आहे, सेटलमेंट करतो,’ असा टोलाही रवी राणा यांनी बच्चू कडू यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.