75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

नाशिकच्या देवळा तालुक्यातील बुटेश्वर शिवारात काल सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडलीय. शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा यात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. तेजस व मानव गणेश आहेर अशी या दोन्ही मुलांची नाव आहेत. दुपारच्या सुमारास शाळेतून घरी परत आल्यावर घरातील सर्व जण कांदा काढणीच्या कामात व्यस्त असताना घडली आहे.

https://maheshvarta.in/who-exactly-is-mla-nilesh-lanke/

दोन्ही भावंड शेतात गेली होती, मात्र जवळच्या डोंगरावरून काही माकडांची कळप शेतात आला होता. त्यांना हुसकावण्याच्या नादात दोन्ही भाऊ त्यांच्या मागे गेले होते. या दरम्यान डोंगर उतारावर असलेल्या एका शेततळ्यावर त्यांची नजर पडली. दोघंही त्यादिशेने गेले आणि तळ्यातील पाणी पाहताना मोठा भाऊ तेजसचा पाय घसरून तो पाण्यात पडला. लहान भाऊ मानवने त्याला वाचविण्यासाठी हात दिला. मात्र तोही तळ्यात ओढला गेला. त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या लहान बहिणीने शेताकडे धाव घेत आई-वडिलांनाही गोष्ट सांगितली. घरातील सर्वांनी हातातील कामे टाकून तळ्याकडे धाव घेतली मात्र, शेततळे अर्धे भरलेले असल्याने तोपर्यंत दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने कुटुबांवर शोककळा पसरली आहे.

शेततळ
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...