75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Accident News : मीरा रोडवर भीषण अपघात घडला आहे, या अपघातामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.

Accident News : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मीरा रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. पाण्याच्या टँकरला स्कुटीचालक महिला ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या रिक्षासोबत या स्कुटीची धडक झाली. या अपघातामध्ये स्कुटीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. वैभवी दिलीपभाई देसाई वय 39 असं या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. या अपघात प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, घटनेबाबत पुढील तपास सुरू केला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  मीरा रोडवर असलेल्या गौरव वुड्स फेज 2 च्या गेटजवळ हा अपघात घडला आहे. पाण्याच्या टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला. अपघातग्रस्त स्कुटीवर दोन महिला होत्या. टँकरला ओव्हरटेक करत असताना समोरून रिक्षा आली, या रिक्षाची धडक स्कुटीला बसली. धडकेमुळे स्कुटी स्लीप झाली. यावेळी मागे बसलेल्या  वैभवी देसाई यांच्या डोक्याला जबर मार लागला.

दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं या अपघातामध्ये जखमी झालेल्या देसाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.  या प्रकरणी कनकिया पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या अपघाताच एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...