Rain Alert in Maharashtra : राज्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आले आहेत
Rain Alert in Maharashtra : अतिमुसळधार पाऊस आणि पुरामुळे आज अनेक जिल्ह्यांतील शाळांना सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. पुणे शहरातील सर्व शाळांना आणि जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे
दरम्यान आजही पुण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यातील घाट माथ्यावरील भागात अतिमुसळधारेचा तर इतर भागांमध्ये मुसळधार ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे
काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा रेड अलर्टही देण्यात आला आहे. यात रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
कृष्णा नदीच्या महापुरात पोहोयला गेला अन् घडलं भयंकर, VIDEO पाहून अंगावर येईल काटा
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील काही भागांत तर साताऱ्यातील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी अत्याधिक मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून 60-70 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27°C आणि 24°C च्या आसपास असेल.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.