75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

पोलीस

शिवानी अग्रवालसह पती विशाल अग्रवाललासुद्धा न्यायालयाने आता या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याचं समोर आलं असून या प्रकरणी शिवानी अग्रवालला अटक केली आहे. शिवानी अग्रवालसह पती विशाल अग्रवाललासुद्धा न्यायालयाने आता या प्रकरणात पोलीस कोठडी सुनावली आहे.  दोघांनाही ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय. तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींचे डीएनए नमुने घ्यायचे असून ३ लाख रुपये कोणाकडून घेतले याचा तपास करायचा असल्याचं न्यायालयात सांगितलं. दरम्यान, हे षडयंत्र नसल्याचं म्हणत आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी न्यायालयात रक्ताचे नमुने हे शिवानी अग्रवाल यांचे असल्याचं कबूल केलं. रक्ताचे नमुने आमच्या अशीलानेच दिले आहेत आणि ऑनरेकॉर्ड आम्ही हे मान्य केलं असल्याचं वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं. शिवानी अग्रवाल स्वत: सरेंडर झाल्या असून त्यांच्या पुढील तपासाची गरज नाही. त्यामुळे पोलीस कोठडी ऐवजी MCR मिळण्यासाठी वकिलांनी विनंती केली.

चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलं की,  साक्षीदार, एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की विधी संघर्षात बालकाच्या ऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले. या सगळ्या षडयंत्र मध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे डी एन ए सँपल घ्यायचे आहेत. ३ लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे.  विशाल, शिवानी यांच्या घराची झाडाझडती आहे. ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी न्यायालयाला चौकशी अधिकाऱ्यांनी विनंती केली.

सरकारी वकिलांनी रक्त बदलण्याच्या प्रकरणी पालकांचा थेट सहभाग असल्याचं म्हटलं. विधी संघर्षात बालकाचे हे पालक आहेत. शिवानी अगरवाल हिला ससूनमध्ये जायला कोणीतरी सांगितलं आहे. रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितलं यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

आरोपींच्यावतीने वकिलांनी न्यायालयात सांगितलं की,  १९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सी सी टिव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी. तसंच यात कोणतेही षडयंत्र झालंय असं आम्हाला असं वाटत नाही. पोलिसांनी ऑलरेडी सीसीटीवी ताब्यात घेतले आहे. त्याचा ते तपास करताहेत.

 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...