75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Political News : काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे देण्याची ऑफर त्यांना दिल्याची चर्चा होती. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

Political News : गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांची सभा पार पडली. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेतृत्व राज ठाकरे यांच्याकडे देण्याची ऑफर त्यांना दिल्याची चर्चा होती. यावरही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. तसेच एनडीएमध्ये सहभागी होणार का? आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भूमिका काय असेल? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील जनतेच्या मनात होते. या सर्वांची उत्तरे राज ठाकरे यांनी दिली आहेत.

 

राज ठाकरे यांना काय ऑफर होती?
आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला बोलतात, आपण एकत्र आलं पाहिजे, मी म्हटलं काय केलं पाहिजे. अशी वर्षांपासून चर्चा सुरू आहे. मला देवेंद्र फडणवीस सुद्धा सांगत होते. आपण एकत्र आलं पाहिजे. पण एकत्र आलं पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे? हे कळत नाही. मग मी अमित शहांना फोन केला आणि मला तुम्हाला भेटायचं आहे, असं सांगितलं. त्यानंतर मी दिल्लीला गेलो. मग निशाणीवर विषय आला. जागावाटपाबद्दल चर्चा झाली, मी खरं सांगू का, मी शेवटच्या जागावाटपच्या चर्चेला 1995 ला बसलो होतो. त्यामुळे माझा तो टेम्पारमेंटच नाही. जागावाटप मला करता येत नाही. आमच्या निशाणीवर लढा, असं सांगितलं. हे रेल्वे इंजिन आहे ना, तुमच्या कष्टाने उभं केलं आहे, हे आयतं आलं नाही. सहज आलं म्हणून लढत नाही. चिन्हावर कोणतीही तडजोड नाही, असं स्पष्टपणे सांगितल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.

नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा

राज ठाकरे लोकसभा निवडणूक लढणार का?
राज ठाकरे म्हणाले, की आज मी तुमच्याकडे स्पष्ट बोलायला आलो आहे. पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे. जर त्या पूर्ण झाल्या नाहीतर राज ठाकरे आहे. जर खंबीर नेतृत्व असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही, भाजप, शिवसेना युतीला नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, असं मी त्यांना सांगितलं. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, पुढचा विचार पुढे, जोरदार कामाला लागा. अजूनही जर समोरच्या लोकांची बकबक झाली तर दार खिडक्या माझ्या मोकळ्या आहेत. तर यावेळी देखील मनसे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...