पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आणि एक जण किरकोळ जखमी झाला आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. ब्रिझा गाडीचा टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. अपघातामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्णत: चुराडा झाला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (TS 07 GL 2574) गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर गाडीच्या पुढच्या डाव्या बाजूचा टायर फुटला, त्यामुळे गाडी साधारण 50 मीटर जमिनीला घासत गेली. गाडीने डाव्या बाजूला चार ते पाच पलट्या खाल्या आणि ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जाऊन गाडी जोरात धडकली.
गाडीमध्ये सहा पुरुष होते त्यापैकी 5 जण जागीच ठार झाले होते, तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. याशिवाय सय्यद इस्माईल सय्यद आमीर याला किरकोळ मार लागला आहे. हे सर्व तेलंगणा राज्यातील नारायणखेड, तालुका मेंढक येथील रहिवासी आहेत. अपघाताची माहिती मिळताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहांना बाहेर काढण्यात आलं, तसंच जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं.
अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं
- रफिक कुरेशी, वय – 34
- इरफान पटेल वय 24
- मेहबूब कुरेशी – 24
- फिरोज कुरेशी – 28
- फिरोज कुरेशी – 28
- जखमी – सय्यद इस्माईल कुरेशी