Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर टीका केली आहे.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत हेते. मराठ्यांना दोघांनी मिळून आरक्षण द्यावं, हे गैरसमज निर्माण करत आहेत, घुमवा घुमवी करत आहेत. द्यायचे असेल तर द्या असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोधक आणि सत्ताधारी दोघांवरही जोरदार निशाणा साधला आहे. आरक्षण देणार नसाल तर पाडापाडी करावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठ्यांना दोघांनी मिळून आरक्षण द्यावं, हे गैरसमज निर्माण करत आहेत, घुमवा घुमवी करत आहेत. द्यायचे असेल तर द्यावे. काहीही करा, जे करायचे ते करा पण आम्हाला आरक्षण द्या. ते म्हणतात हे येत नाहीत, हे म्हणतात ते येत नाहीत. समाजाला वेड्यात काढत आहेत. समाजात खदखद आहे हे कळत नाही का यांना असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
Sharad Pawar : मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार..
दरम्यान ‘काही लोक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना संपवण्याची भाषा करत आहेत, पण 100 पिढ्या आल्या तरी देवेंद्र फडणवीस यांना ते संपवू शकत नाहीत’ असा हल्लाबोल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केला होता, या टीकेला देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘फुकटात निवडून येणारे गैरसमज निर्माण करतात. मागच्या दाराने येणारे यांच्यावर काय बोलावे कळत नाही. मराठ्यांच्या सुनामी मुळे यांची अवस्था वाईट होणार आहे. उधार घ्याचे असेल तर दुकादराला गोड बोलावे लागते तशीच यांची अवस्था आहे.’ असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
हातात ‘घड्याळ’ नसतानाही पवारांनी अचूक टायमिंग साधलं; अजित दादांना मोठा धक्का!