75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange Patil health update: मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची सक्त गरज असल्याचं डॉ पाटील म्हणाले आहेत. जरांगेंनी असं न केल्यास “ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणाले.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. गेल्या 5 दिवसांत जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली. मात्र उपचार आणि पाणी घेतलेलं नाही.त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. काल संध्याकाळी उशिरा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांनी त्यांची तपासणी केली. मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनवणी देखील करण्यात आली मात्र त्यांनी उपचार घेतलेले नाही. त्यामुळे जरांगे यांच्या उपोषणाबाबत आता सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत घसरला आहे. डॉक्टरांनी अलिकडेच केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे. जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची सक्त गरज असल्याचं डॉ पाटील म्हणाले आहेत. जरांगेंनी असं न केल्यास “ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणाले.

मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिलेली मुदत 13 जुलै रोजीच संपली आहे. अशा परिस्थितीत मनोज जरांगे आक्रमक भूमिकेत आहेत. जरांगेंनी उपोषण सुरू केलं आहे. दुसरीकडे मागेल त्या मराठा बांधवाला आरक्षण आणि मराठ्यांना ओबीसीमधून टीकणारं आरक्षण या मागणीवर जरांगे ठाम आहेत. अन्यथा राज्यातील विधानसभा निवडणुकीत सरकारला कचका दाखवू, असं जरांगेंनी या आधीच स्पष्ट केलं आहे. 288 उमेदवार पाडण्याचा इशारा जरांगेंनी दिलेला आहे.

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...