75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

manoj jarange

Manoj Jarange : बांगलादेशपेक्षा जास्त मस्ती यांना आली आहे, पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Manoj Jarange : बांगलादेशपेक्षा जास्त मस्ती यांना आली आहे, पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, त्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला आहे. तसंच लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. बांगलादेशमधून सरकारने धडा घेतला पाहिजे, असंही मनोज जरांगे म्हणाले.

सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे की राज्यात दंगली घडल्या पाहिजे. ओबीसी आमच्या अंगावर घालतात. गोरगरिबांसोबत कसायासारखं वागतात, मात्र आम्ही मराठा समाज असं काही होऊ देणार नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Pune Rain : पुण्यातील शेकडो कुटुंब पुरामुळे विस्थापित; प्रशासनाने केली निवाऱ्याची व्यवस्था..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेवर मनोज जरांगे यानी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी प्रकाश आंबेडकरांचा आदर करतो, त्यांनी आमची हाक ऐकली पाहिजे. गोरगरिबांना वाटत आहे की राजकारण्यांना पायाखाली दाबायची  संधी आली आहे. गरिबांच्या नेत्यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे. गोरगरिबाला सत्तेत जायची एवढीच संधी आहे, आणि ही भावना मी प्रकाश आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहे. त्यांनी भावना समजून घ्यावी.

राज ठाकरेंवरही निशाणा

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होतं, यावरूनही मनोज जरांगे पाटील यांनी निशाणा साधला आहे. हे पैशावर झोपणारे लोक असून यांना आरक्षणाचं काय कळणार आहे? अशी टीका जरांगेंनी केली आहे. धाराशीव दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंना जाब विचारला होता. मात्र त्यांना काय गरज आहे जाब विचारायची? त्यांना आरक्षणाचं काय कळतंय? त्यांना गोरगरिबांच्या भावना काय कळणार? ते आमच्या भावनेशी खेळत आहेत, मात्र मराठ्यांनी तसल्याला किंमत देऊ नये, कुणालाही विचारायला जाऊ नये, असं म्हणत जरांगेंनी राज ठाकरेंवर टीका केली.

Raj Thackeray On Reservation : “उद्या माझ्या हातात राज्य आलं तर…”, आरक्षणावरून राज ठाकरेंनी पुन्हा स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी जे बोललोय…”

Manoj Jarange
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...