Loksabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Loksabha elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मी मागची 54 वर्ष बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम केलं, उद्धव ठाकरेंकडून माझ्यावर अन्याय झाला, असं बबनराव घोलप म्हणाले आहेत.
अमेरिकेत नोकरीला गेलेला पुण्याचा तरुण बेपत्ता, कंपनीने केला मेल; पालक हादरले..
‘मला संपर्क प्रमुख पदावरून काढलं, तिथे काहीतरी काळंबेरं झालं असं म्हणता येईल, त्यामुळे मी उपनेते पदाचा राजीनामा दिला. शिंदेसाहेब गोरगरिबांचं काम करतात, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. मध्यंतरी मी समाजाचे काही प्रश्न मांडले, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मी 25 वर्ष आमदार राहिलो आहे, माझ्याकडे महाराष्ट्राची माहिती आहे, त्यामुळे मला राज्यातील जी जबाबदारी मिळेल, ती पार पाडेन’ असं वक्तव्य बबनराव घोलप यांनी केलं.
घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण उद्धव ठाकरेंनी भाऊसाहेब वाचचौरेंना तिकीट दिल्यामुळे घोलपांनी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. बबन घोलप यांच्या शिवसेना प्रवेशाने नाशिक मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून घोलप यांच्या शिवसेना प्रवेशाने एन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला मोठा चेहरा मिळाला आहे. बबनराव घोलप पाचवेळा आमदार आणि एकदा मंत्री राहिले.
नाशिकमध्ये भीषण अपघात; ट्रकनं दुचाकीला उडवलं, एकाचा मृत्यू..