Laxman Hake : ‘याचा अर्थ असा की जरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आमची सामाजिक भूमिका होती. आजपर्यंत आम्ही आमदार…’
Laxman Hake : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाच्या मागण्यासाठी लक्ष्मण हाके सुद्धा मैदानात उतरले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाही. अशातच आता मनोज जरांगे-पाटलांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, ओबीसी लोकप्रतिनिधींना आम्ही देखील निवडणुकीत पाडू शकतो, असं वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाकेंनी केलं आहे.
सांगलीत ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा 11 ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी लक्ष्मण हाके हे सांगलीत आले होते. यावेळी हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
‘महाराष्ट्रात एकाची आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी लेखी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे हे सर्व आमदार पडले पाहिजेत. याचा अर्थ असा की जरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आमची सामाजिक भूमिका होती. आजपर्यंत आम्ही आमदार आणि खासदारांना टार्गेट केले नाही. मात्र, आरक्षणाच्या लढाईवर हे लोकप्रतिनिधी आपली भूमिका स्पष्ट करत नसल्याने हे सर्व लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत, अशी आमची भूमिका असल्याचा इशारा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.
Viral Video : अशी WagonR चालवताना कधी पाहिलं नसेल, दाराबाहेर लोंबकाळून फिरवली स्टेअरिंग
तसंच, पंचायत राजमध्ये अजूनही निवडणूक होत नाही. चार ते पाच वर्षे झाले तरी राज्य शासनातर्फे न्यायालयात सलग सुनावणी घेण्याची विनंती करण्यात येत नाही. हा एक अंडर करंट आहे. त्यामुळे आहे त्या आरक्षणावर निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी आहे. सांगलीतील एल्गार मेळाव्याला पश्चिम महाराष्ट्रातून ओबीसी बांधव येणार आहेत. महाराष्ट्रात एकाची आमदाराने ओबीसी आरक्षणाच्या लढाईसाठी लेखी पाठिंबा दिला नाही. त्यामुळे हे सर्व आमदार पडले पाहिजेत. याचा अर्थ असा की जरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. आजपर्यंत आमची सामाजिक भूमिका आहे. आजपर्यंत आम्ही आमदार आणि खासदारांना टार्गेट केले नाही. त्यामुळे हे सर्व लोकप्रतिनिधी पराभूत झाले पाहिजेत ही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितलं.
‘जरांगे पाटील यांची मागणी ठीक आहे. पण ओबीसी आरक्षणामुळे त्यांचे नुकसान झालं आहे. हे त्यांच्या डोक्यात घातलं कोणी? आरक्षण मागत असताना संविधानात काय तरतुदी आहेत त्यांचा अभ्यास त्यांना नाही. त्यांनी त्यांच्या सल्लागारांना घेऊन अभ्यास करावा, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
‘शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी’
‘आज आम्ही सामाजिक भमिक घेतली आहे. उद्या आम्हाला राजकीय भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा. १९९३ ला जी भूमिका त्यांची होती ती भूमिका त्यांनी आज मांडावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मागणी यावेळी हाकेंनी केली.
सांगूनही त्यानं ऐकलं नाही; डॉक्टर तरुणीनं आयुष्यच संपवलं, छ. संभाजीनगरात खळबळ