75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Gold

Gold-Silver Price Today : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price Today : १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६६,१९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६६,२६० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७४,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७४,३८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,५८३ रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६६,०९० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,५८३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६६,०९० रुपये आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...