Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं दुचाकीला उडवलं, या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. लक्झरी बसनं दुचाकीला उडवलं, या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. मळद गावच्या हद्दीमध्ये हा भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव बसनं धडक दिली. या घटनेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावरील दौंड तालुक्यातील मळद गावच्या हद्दीमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकी वरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना घागरे वस्ती जवळील दुभाजकाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना हा अपघात घडला आहे. पाठिमागून येणाऱ्या भरधाव बसनं दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय गंगाधर यादव व त्यांच्या पत्नी सुमन यादव असं मृत व्यक्तींची नावं आहेत. दरम्यान हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे.