75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

Crime News : अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारी झाली होती.

Crime News : पुणे शहरातील कोयता गँग आणि गँगवारचे प्रकरण आता जिल्ह्यात पसरु लागले आहे. पुणे जिल्ह्यात खुनाची एक खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. एखाद्या चित्रपटापेक्षाही जास्त थरारक हे सीसीटीव्ही फुटेज आहेत. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या हॉटेलमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. (Crime)

या घटनेत अविनाश बाळू धनवे (रा. आळंदी) याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले आहे. इंदापूर (Indapur) शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर (Indapur) शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (Hotel Jagdamba) आज (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.

अधिकची माहिती अशी की, अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेला होता. यावेळी अचानक  दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्याच्यावर वार केले. त्यामुळे त्याच्या जागीच मृत्यू झाला. 

पूर्व वैमनस्यातून खून करण्यात आल्याचा अंदाज 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्या डोक्यातही गोळी लागली.गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते.  

गेल्या 5 वर्षात पुण्यात गुन्हेगारीच्या प्रकरणांनी शिखर गाठलाय. देशभरातून लोक पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात स्थलांतर करत असतात. त्यामुळे पुण्याची लोकसंख्या देखील प्रचंड वाढली आहे. शिवाय गेल्या काही वर्षात पुण्यात बंदुक बाळगणाऱ्या लोकांच्य संख्येत देखील मोठी वाढ झाली आहे.  382 गुन्हे पाच वर्षात दाखल झाली आहेत. विनापरवाना पिस्तूल वापरल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 461 पिस्तूलदेखील जप्त करण्यात आले होते. 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...