75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

crime

Crime News : पत्नीने स्वयंपाक घरातल्या चाकूने पतीची हत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Crime News :  पुण्यात पत्नीने पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडलीय. नऱ्हे इथं ही घटना उघडकीस आलीय. पत्नीने स्वयंपाक घरातल्या चाकूने पतीची हत्या केली. रविवारी सायंकाळी ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. सिंहगड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, नऱ्हे इथल्या मनाजीनगर परिसरात एका सोसायटीत रखवालदार म्हणून किरपा बिश्त कुटुंबिय काम करत होतं. किरपा बिश्त यांचा पत्नी हिरा बिश्त हिने खून केला. किरपा याला दारुचं व्यसन होतं. तो दारू पिऊन पत्नी हिराला मारहाण करत होता. तिचा छळ करत असल्याने हिरा त्रासली होती. यातून दोघांमध्ये सतत वादही होत होते.


किरपा रविवारी सायंकाळी दारू पिऊन घरी आला. तेव्हा त्याचा पुन्हा पत्नी हिरासोबत वाद झाला. त्याच वादात किरपाने हिराला मारहाण केली. तेव्हा संतापलेल्या हिराने स्वंयपाक घरातला चाकू घेत किरपावर वार केले. हिराने किरपाच्या पोटात चाकू भोसकला. यात गंभीर जखमी झालेल्या किरपाचा जागीच मृत्यू झाला

पोलिसांनी या प्रकरणी हिरा हिला अटक केलीय. सिंहगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हिराला रात्री उशिरा अटक करण्यात आलीय. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Crime
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...