Crime news : मृतकाच्या बहिणीची आरोपी नातेवाईकाने इमारतीच्या छतावर छेड काढली होती. हे मृत अल्पवयीन ६ वर्षीय भावाने बघितलं आणि त्याची तक्रार आईला करणार असल्याचं सांगितलं.
Crime News : ६ वर्षीय अल्पवीयन मुलाची राहात्या घराच्या छतावर २२ वर्षीय नातेवाइकानेच गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतकाच्या बहिणीची आरोपी नातेवाईकाने इमारतीच्या छतावर छेड काढली होती. हे मृत अल्पवयीन ६ वर्षीय भावाने बघितलं आणि त्याची तक्रार आईला करणार असल्याचं सांगितलं. यानंतर नराधम नातेवाईकाने त्याचा गळा आवळून बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं. ही घटना भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीत घडली आहे.
याप्रकरणी नारपोली पोलिसांनी तांत्रिक तपास करून २४ तासातच आरोपी नातेवाईकाला बेड्या ठोकल्या आहेत. अमोल भाईदास चव्हाण उर्फ नानू (वय, २२) असे आरोपीचे नाव आहे. तर सुधीर विष्णू पवार (६) असे हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक मुलगा आई-वडील, बहिणी आणि आरोपी नातेवाईक यांच्यासोबत भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे गावातील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता. खबळजनक बाब म्हणजे आरोपीला मृतकाच्या आई-वडिलांनी नातेवाईक असल्याने आपल्याच घरात आसरा दिली होता. मात्र आरोपी त्यांचा विश्वासघात करून त्यांच्याच 18 वर्षीय मुलीवर वाईट नजर ठेवून होता. त्यातच 21 जुलै रोजी इमारतीच्या छतावर सुधीरचा मृतदेह आढळून आला होता.या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला गेला. नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सुधीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रवाना करण्यात आला होता. त्यावेळी सुधीरच्या गळ्यावर व्रण असल्याचे डॉक्टरांनी उत्तरणीय तपासणीनंतर पोलिसांना सांगितले.