Accident News : गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
Accident News : गोंदियामध्ये खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचं नियंत्रण सुटून हा अपघात झाला.
या अपघातामध्ये दहा ते बारा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे, जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
गोंदिया-कोहमारा मार्गवरील गंनखैरा मील जवळ हा अपघात झाला. ही बस हैदराबादवरून मध्य प्रदेशातील लांजी येथे प्रवासी घेऊन निघाली होती.
अपघातग्रस्त बस चालकानं दिलेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या बसनं कट मारल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटलं. समोर उभ्या असलेल्या ट्रकला वाचवण्याच्या नादात बस रस्त्याच्या कडेल उतरली.
या घटनेत दहा ते बारा प्रवासी जखमी झाले असून, घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती गोंदिया पोलिसांकडून देण्यात आली आहे.