75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

बैल

बैलांनी स्वत:च जू खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पती-पत्नीचे प्राण वाचवले. बीडच्या लोणी घाट इथं ही घटना घडली असून आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

वीज कोसळल्याने जखमी झालेल्या पती-पत्नीला घरच्या बैलांनी वाचवल्याची घटना बीडमध्ये घडलीय. वीज कोसळल्यानंतर जखमी झालेले दाम्पत्य जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. त्यावेळी बैलांनी स्वत:च जू खांद्यावर घेत त्यांनी शेतकरी पती-पत्नीचे प्राण वाचवले. बीडच्या लोणी घाट इथं ही घटना घडली असून आता त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. वीज कोसळल्याच्या घटनेत विभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. दीड महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्यांना बैलांमुळे कसे जीवदान मिळाले हे समोर आलंय.

Gold-Silver Rates : सोन्याच्या दरात मोठी घसरण; चांदीही झाली स्वस्त, गुंतवणुकीबाबत तज्ज्ञ काय सांगतात?

विभीषण कदम आणि त्यांच्या पत्नीला बैलाने मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. ५ जूनला बीडमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसात वीज कोसळून विभीषण कदम आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली होती. दोघेही अर्धा तास बेशुद्धावस्थेत पडले होते. बैलगाडीत चढण्याचा ते प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांचे दोन्ही बैल प्रधान आणि राजा यांनी स्वत: जू खांद्यावर घेतलं. विभीषण यांनी चल आता घरी सोड असं म्हणताच दोन्ही बैलांनी साडेतीन किमी अंतरावर असलेल्या घरी शेतकरी दाम्पत्याला नेलं.

विभीषण कदम यांच्या घरी येताच बैलांनी हंबरडा फोडला. तेव्हा विभीषण यांचा मुलगा आणि सून बाहेर धावत आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेल्याने दोघांचेही प्राण वाचले. दोन्ही बैलांमुळे विभीषण आणि त्यांच्या पत्नीला वेळीच उपचार मिळाले. पती-पत्नीवर दीड महिना उपचार सुरू होते. बैलांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे आता त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे.

 

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...