75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime News

Ahmednagar Crime News : पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Ahmednagar Crime News :  हातावरची मेहंदी उतरली आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याच्या काळात नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयानं संपूर्ण गावं हादरलं आहे. सुखी-गुण्यागोविंदाने नांदण्याची स्वप्न स्वप्नच राहिली. नवविवाहित दाम्पत्याने अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि गावात एकाच खळबळ उडाली.

नवदाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर इथे धक्कादायक घटना घडली आहे.

वैभव आमले आणि स्नेहा आमले असं दोघांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांचा तीन महिन्याआधीच विवाह झाला होता. पुण्यात नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते.

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील वैभव दत्तात्रेय आमले वय वर्ष 22 व स्नेहा वैभव आमले वय वर्ष 20 या नवविवाहीत दापत्यांनी रवीवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती समजतात स्थानिक रहिवासी आणि साकुर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.

पुण्यातून गावी आल्यानंतर दोघांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कारण समजू शकलं नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कोणत्याही गोष्टीला आयुष्य संपवणं हा पर्याय नसतो. नवंदाम्पत्याने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याची चर्चा गावात सुरू झाली आहे. पोलीसही नातेवाई, मित्रांची चौकशी करत आहेत.

 

Crime News
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...