75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

नाशिकमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  नांदगाव -मालेगाव मार्गावर हिरे नगर परिसरात हा अपघात झाला आहे. भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

अमेरिकेत नोकरीला गेलेला पुण्याचा तरुण बेपत्ता, कंपनीने केला मेल; पालक हादरले..

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव -मालेगाव मार्गावर हिरेनगर जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातातील मृत आणि जखमी तरुणाचं नाव अद्याप समोर आलेलं नाहीये. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेत दुचाकीचं देखील मोठं नुकसान झालं आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...