Maharashtra weather : आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Maharashtra weather News : सध्या राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, काही भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (imd) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं याभागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्या पावसाचा शेती पिकांना फटका, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी
जळगाव जिल्ह्यात गेल्या महिना भरापासून संततधार पाऊस सुरु असल्याने अनेक शेत शिवारात पाणी साचून राहिल्याने पीक खराब होत असल्याचं बघायला मिळत आहे. त्याचबरोबर नुकत्याच काढनीवर आलेल्या उडीद मूग पिकाच्या शेंगामधील दान्याना कोंब फुटल्याने शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करून, शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.