हे चॅम्पियन्स कशा पद्धतीने काम करणार आहेत, याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव यांनी महत्त्वाची माहिती दिली.
बालविवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, अजूनही समाजातील काही लोकांची मानसिकता बदललेली नाही, हे अनेकदा दिसून येते. अशी लोकं आपल्या मुलांचा बालविवाह करुन देतात. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून चॅम्पियनशिप नेमणूक करण्यात आली आहे. हे चॅम्पियन्स कशा पद्धतीने काम करणार आहेत, याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव यांनी महत्त्वाची माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक आरोग्य या सर्व विभागातील अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यासोबतच शहरी भागांमधील महानगरपालिका, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा महिला आणि बालकल्याण विकास या विभागातील सर्व अधिकारी काम करत आहेत. हे सर्व लोक यासाठी काम करणार आहेत. मार्च ते एप्रिल या महिन्यांमध्ये तब्बल 64 बालविवाह रोखण्यामध्ये यश हे आलेले आहे आणि एप्रिल ते ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवसापर्यंत तब्बल 42 बालविवाह या अंतर्गत रोखण्यात आल्या आहेत.
पुढे त्यांनी सांगितले की, जेव्हा आम्हाला माहिती मिळते की कुठे बालविवाह होणार आहे, तेव्हा आमचे सर्व चॅम्पियन्स त्या ठिकाणी जाऊन सर्व पालकांचं समूपदेशन करतात. तसेच एखादी विद्यार्थिनी शाळेमध्ये 15 दिवसापेक्षा जास्त गैरहजर राहिली असेल तर तिचा फॉलोअप घेऊन माहिती घेतात. तिचा कुठला विवाह तर होणार नाही आणि जर तिचा विवाह होणार असेल तर आमचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन तिच्या पालकांना समजावून सांगतात आणि हा बालविवाह रोखणेमध्ये आम्हाला यश येते, असेही सुवर्ण जाधव यांनी सांगितले.
लग्नाच्या तिथी विचारांमध्ये घेऊन आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन मंगल कार्यालय, आचारी, कासार त्यासोबतच पंडित आणि ब्युटी पार्लर अशा सर्व लोकांची जाऊन त्यांना समजावून सांगतो. तुम्हाला जर वाटलं की हा बालविवाह होत आहे तर तुम्ही त्वरित आम्हाला संपर्क साधावा, असे आम्ही त्यांना आवाहन करतो. तसेच यामध्ये जर तुम्ही लपवाछपवी केली तर तुमच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, असे त्यांना कळवले जाते. यासोबतच माध्यमिक शाळेच्या मुलींच्या प्रगती पुस्तकांवर आम्ही 1098 हा हेल्पलाइन नंबरदेखील दिला आहे, असे त्यांनी सांगितले.
बालविवाह रोखण्यासाठी आमची संपूर्ण यंत्रनाही चांगल्याप्रकारे काम करत आहे आणि आतापर्यंत आम्हाला चांगले बालविवाह रोखण्यात यशदेखील आले आहे, असेही सुवर्णा जाधव यांनी सांगितले.