Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंहगड रस्ता इथं 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही गायब असल्याची माहिती आहे.
Pune Rain : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सिंहगड रस्ता इथं 5 सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. महापालिका कर्मचारी, प्रशासन आणि पोलीसही गायब असल्याची माहिती आहे. या सोसायट्यांमध्ये तब्बल 200 लोक अडकले होते. मात्र मदतीसाठी कोणतीही यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एकता नगरी सिंहगडरोड, द्वारका, जलपुजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसाट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. पार्किंगमध्ये पाणी आल्यानं वाहनांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे. यावर्षी पुणे महानगरपालिकेनं महापुराच्या अनुशंगाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
Anil Deshmukh on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पैसे मागितल्याचा, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला; अनिल देशमुखांचा सनसनाटी दावा
पुण्यात पावसाचा जोर वाढला असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात 35 हजार 574 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येत आहे. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. या भागातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान खडकवासला धरण १०० टक्के भरलंय. तर टेमघर ५७ टक्के, वरसगाव ६३ टक्के, पानशेत ७६ टक्के भरलंय.
पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले आहे.