75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Manoj Jarange

Manoj Jarange Patil On Amit Shah : मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange ) यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र डेडलाईन संपल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या लोकांकडे आम्हाला देण्यासाठी वेळ नाही, हे फक्त मतदान घेतलं की गरिबांना लाथा घालतात. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत,’ असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

‘अमित शाह यांच्यासारख्या मोठ्या लोकांकडे आम्हाला देण्यासाठी वेळ नाही, हे फक्त मतदान घेतलं की गरिबांना लाथा घालतात. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत, पण यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल,‘असा इशारा जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी दिला आहे. दरम्यान आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेला सुरुवात करणार आहेत. या यात्रेवरून जरांगे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

लक्षण हाके यांची ओबीसी यात्रा ही छगन भुजबळ यांनीच सांगितलेली आहे, भुजबळांशिवाय यांचे पानही हालत नाही. आमचे आंदोलन आहे, तिकडेच भुजबळ आंदोलने करायला लावतात. मी कधीही आंदोलन येवल्याला हलवू शकतो. भुजबळ हे माझ्याकडे आंदोलने करायला लावत आहेत.  मग मी कधीही येवल्याला आंदोलन करू शकतो असा इशारा जरांगे पाटील(Manoj Jarange) यांनी भुजबळांना दिला आहे.

Manoj Jarange
Share the Post:

By admin

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...