75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Accident

Accident News : अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात(Accident) झालाय. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत.

Accident News : अकोला – खामगाव राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रक आणि दूचाकीचा भीषण अपघात (Accident) झालाय. या अपघातात दुचाकीस्वार दोन जण जागीच मरण पावले आहेत. आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली आहे. अकोला खामगाव या नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर भेगा पडल्याय. त्यामुळे ट्रकला ओव्हरटेक करत असताना दुचाकीच चाक या भेगांमधून गेले आणि अडकलं. त्यानंतर मोटरसायकल स्लिप होऊन ट्रकवर आदळली. या अपघातात एकाचा ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने मृत्यू झालाय, तर दुसरा व्यक्तिला देखील अपघातात जिव गमवावा लागला आहे. सचिन जुनारे आणि शाम महल्ले असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

घटनेची माहिती मिळताच वाहतूक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठत, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली आहे. या अपघाताप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. मात्र या अपघतामुळे राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यामुळे या महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.  

Accident
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...