75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पुरावे गायब करण्याची काँग्रेसची परंपरा पहिल्यापासून, पुरावे सोडून द्या लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे. निवडणुका आहेत म्हणून बोलतोय अशातला भाग नाही, हे सगळ असं घडत नाही,’ असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘एक लक्षात घ्या काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर याला योगायोग म्हणता येणार नाही. राजेश पायलट व्यक्ती चांगले होते. ते विचारवंत होते. एआयसीसीच्या अध्यक्षपदाचा फॉर्म भरण्यासाठी निघालो होते, अपघात झाला. त्याचबरोबर माधवराव सिंधिया काँग्रेसमधील लोक त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले होते. त्यांचा पण अपघात झाला. त्याचबरोबर वायएसआर रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधीलच होते. ते त्यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून प्रसिद्ध होऊ लागले होते. त्यांचा पण अपघात झाला. ही मालिका म्हणजे यावर खरच विचार करण्यासारखं आहे. या आगोरसुद्धा पुरावेच नाही तर माणसं देखील गायब केलेले आहेत. ते परत कधीच दिसले नाहीत.’

‘आपली लेकरं डोळ्यासमोर ठेवा अन्…’, मतदानानंतर जरांगे पाटलांनी सांगितला पुढचा प्लॅन

दरम्यान या सर्वांमागे काँग्रेसचा खरच हात आहे का असाही प्रश्न यावेळी उदयनराजे यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाला मात्र त्यांनी सावध उत्तर दिलं आहे.  ‘प्रश्नच असा आहे की कोणी केलं का केलं? पण माझं म्हणणं असं आहे की जोपर्यंत ते नावारुपाला येत नव्हते तोपर्यंत त्यांच्यासोबत काहीही झालं नाही, मग नंतर कसं घडत गेलं’ असा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला आहे.

Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...