75871+

महेश वार्ताची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला, त्रास दिला. त्यालाच कंटाळून विवाहितेनं टोकाचा निर्णय घेतला आहे.

Crime News : मित्र म्हणजे हक्काचा आपण कधीही हक्काने बोलू शकतो असा, जो आपल्या संकट काळात उभा राहतो असं मित्र, मात्र याच मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मित्रांनी विवाहितेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला, त्रास दिला. त्यालाच कंटाळून विवाहितेनं टोकाचा निर्णय घेतला आहे.

मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. विवाहित महिलेनं तीन मित्रांच्या त्रासाला कंटाळून तलावात उडी घेऊन आयुष्य संपवलं आहे. एका गृहस्थाने याबाबतची माहिती मृत विवाहितेच्या पतीला फोन करुन दिली आणि एकच खळबळ उडाली.

मृत विवाहितेच्या पतीनं दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने तिचा मोबाईल चेक केला. त्याला मोबाईलमधून धक्कादायक गोष्ट समजली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मयतीचे पती आणि मुलं हे सगळे पुण्यात कामानिमित्ताने राहतात. ते सगळे आपल्या मूळगावी आले होते. तीन पैकी एक आरोपी हा त्यांचा नातेवाईक आहे. तर तीन आरोपी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. नातेवाईक असलेला आरोप कायम मयत महिलेच्या घरी येत-जात होता त्यामुळे पतीलाही कधी संशय आला नाही.

पती तातडीने तलावाजवळ पोहोचला. तिथे मयत महिलेचा फोन आणि चपला होत्या. लोकांनी मयत महिलेला बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र तिथे मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर मयत महिलेचा मोबाईल चेक केल्यानंतर तीन मित्र तिला सतत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत होते. तिला त्रास देत होते, हे समोर आलं. त्याच त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहिती मिळाली आहे.

पतीनं पोलिसांना फोन आणि पुरावे दाखवले असून त्याने तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढे काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Crime News
Share the Post:

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: बातमी कॉपी करणे हा गुन्हा आहे...