Viral Video : आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, चर्चेत राहण्यासाठी अनेक निराळ्या आणि हटके गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात.
Viral Video : आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी, चर्चेत राहण्यासाठी अनेक निराळ्या आणि हटके गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करुन लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. मात्र या नादात काहीवेळा लोक अपघाताही बळी ठरतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय.
ट्रेनसोबत व्हिडीओ बनवण्याच्या नादात एका महिलेचा जीव गेला. ट्रेनला धडकून तिचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य खूप भयानक असून पाहूनच अंगावर काटा उभा राहिल. या घटनेचा लाईव्ह व्हिडीओही समोर आला आहे.
अपघाताच्या घटनेचा समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक ट्रेन येत आहे आणि त्या ट्रेनला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत फोटो, व्हिडीओ काढण्यासाठी लोकांची उत्सुकता पहायला मिळतेय. मात्र ट्रेन जवळ आली तरीही एक तरुणी व्हिडीओ घेण्यासाठी अगदी ट्रॅकच्या जवळ गेली. ट्रेन येताच तिचं डोकं ट्रेनच्या खालील भागत असलेल्या इंजिनला जोरात धडकलं आणि महिलेचा जागीच मृत्यू झाला. हे दृश्य श्वास रोखणारं होतं. कोणीही हे पाहिल्यावर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, मेक्सिकोतील हिडाल्गो येथे घडलेली ही हृदयद्रावक घटना आहे. ज्यामध्ये एका मुलीने ट्रेनजवळ जाऊन रील काढण्याच्या प्रयत्नात आपला जीव गमावला. रील बनवत असताना एक मुलगी रुळाच्या इतकी जवळ गेली की, तिला ट्रेनने धडक दिली. मुलगी जागेवरच पडली आणि पुन्हा उठली नाही.